Friday, 19 April 2019

*ईशान्य मुंबईत भाजपचे मनोज कोटक यांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद*

  पवित्र समय न्यूज(मुंबई) १९/०४/२०१९


ईशान्य मुंबईतील भाजपा शिवसेना रिपाई व रासपा महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली असून त्यांना जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 ईशान्य मुंबईत जनतेची मनस्थिती *'फिर एक बार - मोदी सरकार'* अशी असून गेल्या ५ वर्षात मोदी सरकार ने देश हितासाठी केलेल्या विधायक कामांची पोच पावती म्हणून मनोज कोटक यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचा लोकांचा मानस असल्याचे मतदार संघात फेर फटका मारताना स्पष्ट दिसून येते .

आपल्या प्रचाराच्या पहिल्या फेरीत मनोज कोटक यांनी घाटकोपर पूर्व व पश्चिम , विक्रोळी, भांडुप, मानखुर्द आणि मुलुंड या सहाही विधानसभा अक्षरशः पिंजून काढल्या आहेत.

घाटकोपर [प ] येथे भटवाडी, घाटकोपर [पू ] येथे पंत नगर व राजावाडी, विक्रोळी येथे कन्नमवार नगर, टागोर नगर , भांडुप मध्ये कोंकण नगर व महाराष्ट्र नगर , मुलुंड पूर्व आणि पश्चिम आणि मानखुर्द मधील आण्णाभाऊ साठे नगर येथे त्यांच्या प्रचार फेऱ्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला.

मनोज कोटक यांच्या प्रचारात भाजपा कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेचे व रिपाई चे स्थानिक नेते व कार्यकर्ते सुद्धा मोठ्या हिरहिरीने प्रचाराला लागले आहेत.

प्रचाराच्या या पहिल्या फेरी दरम्यान गुडी पाडवा , राम नवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती , महावीर जयंती आणि हनुमान जयंती असे सणं आले असता मनोज कोटक यांनी सर्व धर्माच्या मंदिरात, जैन मंदिरात, बुद्ध  विहारांमध्ये जाऊन नमन करून आशीर्वाद घेतले .  आंबेडकर जयंती निम्मिताने मनोज कोटक यांनी चैत्यभूमी वर जाऊन डाॅ.बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.

*आपल्या प्रचाराच्या दरम्यान इतके सारे वंदनीय दिवस येणं हा एक शुभ संकेत आहे* व ह्या दिवशी मिळालेले आशीर्वाद आपल्याला देश हितासाठी अधिक कार्य करण्यास बळ देतील असे मनोज कोटक यांनी सांगितले.

आता दिनांक २० पासून मनोज कोटक यांच्या प्रचाराची निर्णायक फेरी सुरु होणार असून या फेरीत महायुती तर्फे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह , जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी .मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री सौ पंकजा मुंडे, रिपाई अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रासपा अध्यक्ष आणि राज्य मंत्री महादेव जानकर असे दिग्गज ईशान्य मुंबईत मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी येणार आहेत . या सर्वांवर कळस म्हणून दि 26 एप्रिल रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे  बी के सी येथे मुंबईच्या महायुतीच्या उमेदवारांच्या साठी विशाल प्रचार  सभा घेणार आहेत.

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, शिवसेना नेते उद्धव जी ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंबा व मार्गदर्शनामुळे आपला विजय पक्का असल्याचा आत्मविश्वास मनोज कोटक यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

PS 15 Dec 2025