Tuesday, 11 February 2020

भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या अधिवेशन स्थळाची
प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहणी


 पवित्र समय न्यूज़ ११/०२/२०२०

 नवी मुंबईतील नेरुळ येथे येत्या रविवारी होणा-या भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या अधिवेशन स्थळाची प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, आमदार गणेश नाईक, रविंद्र चव्हाण,जयकुमार रावल, प्रशांत ठाकूर, माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
          येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील नेरुळ येथील रहेजा युनिव्हर्सलच्या मैदानात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया ही या अधिवेशनात संपन्न होणार आहे.
          अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आज प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी आढावा घेतला. तसेच अधिवेशनातील तयारी संदर्भात आयोजक तथा कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

No comments:

Post a Comment

PS 15 Dec 2025