Wednesday, 17 June 2020

खाजगी लॅबनी कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट थेट रुग्णाला देऊ नये, बीएमसीला द्यावा !
ही कोणती दादागिरी?
महापालिकेने 13 जूनचे परिपत्रक ताबडतोब मागे घ्यावे
भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांची मागणी

 पवित्र समय न्यूज़(मुंबई) १७/०६/२०२०

कोरोनाबाधितांची संख्या मुंबई जास्त असतानाच याआधी ‘कोरोनाचा मृत्यांक घोटाळा’ आणि आता रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल लपवण्याची फसवेगिरी महापालिका करत आहे. खाजगी लॅबधारकांनी कोरोना रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल हे रुग्णांना न देता ते आधी पालिकेला कळवावेत अशा प्रकारचे आदेश महापालिकेने 13 जूनला काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत.  जो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जे आधीच हायरिस्कमध्ये आहेत, त्यांना त्यांचा अहवाल न सांगता खाजगी लॅबनी हा अहवाल आधी पालिकेला सादर करणे म्हणजे हा शुध्द मूर्खपणा असून ही पालिकेची दादागिरी आहे. यात ल़ॉजिक/तर्क काय? असा सवाल करत मुंबई महानगरपालिकेने हे परिपत्रक ताबडतोब मागे घ्यावे अशी विनंती भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्राद्वारे केली आहे.

यामध्ये त्यांनी 5 जून 2020 रोजी काढलेल्या परिपत्रकाबाबत पुन्हा विचार करा आणि 13 जूनचे परिपत्रक मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.

·         13 जून 2020 च्या परिपत्रकात कोणत्याही खाजगी लॅबने रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास तो थेट रग्णाला देऊ नये असे म्हटले आहे.
·         ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत त्यांना अहवाल द्यावे.
·         सकारात्मक अहवाल फक्त महापालिकेमार्फतच दिले जातील. पालिका प्रभावित व्यक्ती/कुटुंबाला कळवेल की, ते/व्यक्ती सकारात्मक आहे.
·         याबाबत दिलेली कारणे आणि तर्क हे अत्यंत चुकीचे/मूर्खपणाचे वाटतात.
·         ज्या व्यक्तीला तातडीने सहकार्याची,उपचाराची गरज आहे तिला थाबंवण्याचे कारण काय ?
·         पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारांची गरज असताना अशा परिपत्रकामुळे रुग्णांना उपचार होण्यास विलंब होणार.

असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. प्रशासन मुंबईतील कोरोनाची स्थिती सुधारवण्याऐवजी ही अशी परिपत्रक काढून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

PS 15 Dec 2025