Monday, 24 February 2020

महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे
मंगळवारी राज्यभर धरणे आंदोलन

 पवित्र समय न्यूज़(मुंबई) २४/०२/२०२०

राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल व त्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आजाद मैदान येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात आपण स्वतः सहभागी होणार आहे.
ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली. या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

हिंदी दिवस पर हास्य कवि कार्यक्रम हुआ संपन्न!

 नई मुंबई वाशी में लायंस इंटरनेशनल द्वारा हिंदी दिवस पर आयोजित हास्य कवि सम्मेलन कार्यक्रम में हिंदी दिवस बड़े उत्साह के साथ मनाई गयी।  हिंदी...